भजनी मालिका

भजने

अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥ अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥ हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंत अपरंपार नाम हें सधर । नाम सुखसागर अमृत लहरी ॥१॥ नाम हेंचि तारूं नाम हेंचि तारक । भवमूळ छेदक नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंत जन्में मेळविता दुर्लभ । तो प्राणवल्लभ शंकराचा ॥१॥ वेदशास्त्र मंथुनी काढियेलें सार । ब्रह्मादिकां पार रामनामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंत तीर्थांचें माहेर । अनंत रूपांचें सार । अनंता अ-नंत अपार । तो हा कटीं कर ठेवूनि उभा ॥१॥ धन्य धन्य पांडु-रंग । सकळ दोषां होय भंग । पूर्वज उद्धरती सांग । पंढरपुर देखिलिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥ हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरी हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीं । ध्यातसे त्रिपुरारी अह-र्निशीं ॥१॥ पाहातसे मुख दशरथ त्याचें । भाग्य मी तयाचें काय वर्णूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव