भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधीक देखणें तरी निरंजन पाहाणें

adhik dekhanen tari niranjan pahanen

अधीक देखणें तरी निरंजन पाहाणें । योगराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनि साधिलें म्यां साधनीं । यानें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फ़िटलें मायाछंदा सांठवलें । सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥३॥ चंदन जे जेविं भरला अश्वत्थ फ़ुलला । तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंचा पाहाणें । निजानंदीं राहणें स्वरुपीं वो माये ॥५॥ ऐसा सागरु । रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु । म्यां देखिला वो माये ॥६॥