भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत नामाचें पाठांतर

anant namachen pathantar

अनंत नामाचें पाठांतर । रामकृष्णनाम निरंतर । सर्व सुखांचें भांडार । हरि श्रीधर नाम वाचे ॥१॥ हरिनाम गजर करा । येणें तूं तरसील सैरा । जन्म जुगाच्या येरझारा । खंडती एक्या हरिनामें ॥२॥ अनंत तीर्थाचे मेळ । साधलिया हरी नाम कल्लोळ । पूर्वजांसहित अजामेळ । उध्दरिला सहपरिवारें ॥३॥ कोटिजन्मांचे दोष । हरतील पातकें जातील नि:शेष । अंतीं होईल वैकुंठ वास । कोटि कुळांसी उध्दार ॥४॥ हें योगियांचें निजजीवन । राककृष्ण नारायण । येणें जगत्रय होय पावन । हरिस्मरण जिवासी ॥५॥ ज्ञानदेवी घर केलें । हरी ऐसें रत्न सांठविलें । शेखीं कोटिकुळां उध्दरिलें । हरी हरि स्मरिलें निशीदिनीं ॥६॥