भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत अनंता परी देखतां अंतरीं

anant ananta pari dekhatan antarin

अनंत अनंता परी देखतां अंतरीं । ह्रदयाभींतरीं मज निववितो माये ॥१॥ चाळवी चक्रचाळ अलमट गोपाळ । यानें केला सुकाळ सहज सुखाचा वो माये ॥२॥ सांगवी ते सांगणी उमगूनि चक्रपाणी । त्या निर्गुणाचे रहणी मी रिघालें वो माये ॥३॥ भ्रांतिभुली फ़ेडूनियां निवृत्ति । रखुमादेविवरु विठ्ठलीं गती जाली वो माये ॥४॥