भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें

adhikar taisa karun upadesh | sahe ojhen tyas ten chi dyaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥ तुका म्हणे फांसे वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥३॥