भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति

adhikacha maj kantala | tumhan gopalan sangati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥ काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥ उद्वेगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥ तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥