भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीं । ध्यातसे त्रिपुरारी अह-र्निशीं

anant brahmande jayache udarin | dhyatase tripurari ah-rnishin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीं । ध्यातसे त्रिपुरारी अह-र्निशीं ॥१॥ पाहातसे मुख दशरथ त्याचें । भाग्य मी तयाचें काय वर्णूं ॥२॥ गंध पुष्प वस्त्रें अर्पोनियां द्बिजां । समभावें पूजा सक-ळांसी ॥३॥ साखरेच्या गोण्या घाला हत्तीवरी । धाडीं घरोघरीं नामा ह्मणे ॥४॥