भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती

abhakta durjana yamadut yatana | nanapari jana karitati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥ नाम नाहीं मुखीं दूत तया ताडिती । नेऊन घालिती कुंभपाकीं ॥२॥ ताम्र भूमीवरी खैराचे इंगळ । लाविताती ज्वाळ अंगालागीं ॥३॥ एका जनार्दनीं यातनेचें दुःख । कोणा सांगेल मूर्ख यमलोकीं ॥४॥