भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपराधाविण बळी । घातला पाताळीं । सवें कणव उपजली । द्बार राखिसी तयाचें

aparadhavin bali | ghatala patalin | saven kanav upajali | dbar rakhisi tayachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अपराधाविण बळी । घातला पाताळीं । सवें कणव उपजली । द्बार राखिसी तयाचें ॥१॥ गार्‍हाणें सांगवें कवणा । केशवा सुजाणा । कोणी आणिक तुजविणा । नाहीं दुसर आह्मातें ॥२॥ बाळमित्र सुदामा सवें जेवी । धान्य जो मागे गांवोगांवीं । विपत्ति त्याची दूर व्हावी । ह्मणून दिधली राणीव ॥३॥ तुझें नाम न तोंडीं । वसुदेव देवकी बांधोडी । कंसा केली धांडडी । ऐसी विपत्ति दाखवुनी ॥४॥ इंद्र वर्षे शिळा धारा । पर्वत केला सामोरा । इंद्रा लविला दरारा । एवढी विपत्ति दाखवुनी ॥५॥ जोहरीं सूदलें पांडवां । सवेंचि उपजली कणवा । त्यासी केला त्वां रिघावा । आंगीं पाहण्या धांवसी ॥६॥ सभा पिशुनाची दाटली । द्रौपदिकाया आंसुडली । तिये वस्रें पुरविलीं । येवढी आपदा दाखवुनी ॥७॥ दैत्ये गांजिला प्रर्‍हादु । तुझ्या नामाचा प्रसादु । ऐसा करूनि वि-नोदु । तया दैत्या वधियेला ॥८॥ बिभीशण हाणितला लाथां । लंका दिधली त्या उचिता । कृपा करें रघुनाथा । समर्थ केला तये वेळीं ॥९॥ गजेंद्र पानेडी । धरिला यमदूत सुसरीं । वैकुंठीहूनि घा – लिसी उडी । येवढी आपदा दाखवुनी ॥१०॥ आह्मां डिंगराचें बोलणें । अनाथनाथा परीसणें । विष्णुदास नामा ह्मणे । शाहणें व्हावें यापरतें ॥११॥