भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसें नदिसे दुजेपण गे माय

abhakta sabhakta doghansi sarakha dise | lavanin jaisen nadise dujepan ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसें नदिसे दुजेपण गे माय ॥१॥ ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं । मौन्य वाक्पुटीं धरुनी गे माय ॥२॥ पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टी । चालवी सर्व सृष्टी गे माय ॥३॥ ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं । एका जनार्दनीं अंतरी दृढ ठसावें गे माय ॥४॥