भजनी मालिका

भजने

अभिमानाच्या भुली । ज्या त्या कर्मीं लिप्त झाली ॥१॥ नेणोनिया ज्ञानमूढें । भोगासक्त पुढें पुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अभिमानें घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया ॥१॥ तुजवांचोनियां जाऊं पाहे प्राण । दाखवी वदन एक वेळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अभिमानें लोक जाती वाराणसी । आमुची मिरासी पंढरीये ॥१॥ तीर्थ व्रत नेम मज केशिराजा । पंढरीचा राजा बोळ – वया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अभेद भक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर ॥१॥ निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिशे वावो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥ येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभ्यासिले वेद जाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा ॥१॥ प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं । तंव कैसा श्रीहरि करील कृपा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अभ्यासीं द्रष्ट आटला । अहं सोहंचा घोट भरला । साक्षित्व देखोनि विराला । वास्तुमाजीं ॥१॥ जो जो वस्तु झाला केवळ । तेंचि अंतःकरण निश्चळ । त्रिगुणाची तळमळ । हारपोनि गेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमराचें ठेवणें विश्वाचें जीवन । सौभाग्य लावण्य र-खुमाईचें ॥१॥ धन्य गौळियां जीणें कृष्ण बाळपण । यशोदा-नंदन क्रीडा करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव