भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें

amar ahan amar ahan | kharen kin paha khoten hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥ न म्हणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥ कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥ देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥