भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार

abhimanachen tond kalen | davi balen andhar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥ लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥ लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥२॥ तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिला तीं ॥३॥