भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिशापासी कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें

abhishapasi karan | mukhya sambhashan parastrichen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अभिशापासी कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥१॥ सहज एकांती बोलूं जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥ मग तें अपघातासी मूळ । करी तात्काळ नावरत ॥३॥ निळा म्हणे प्रमादी ऐसी । प्रमदेपासीं अखंड ॥४॥