भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमानें लोक जाती वाराणसी । आमुची मिरासी पंढरीये

abhimanen lok jati varanasi | amuchi mirasi pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अभिमानें लोक जाती वाराणसी । आमुची मिरासी पंढरीये ॥१॥ तीर्थ व्रत नेम मज केशिराजा । पंढरीचा राजा बोळ – वया ॥२॥ पाउला पाउलीं चालती मारग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥ नामा म्हणे मज पंढरीं विसांवा । दर्शन केशवा पुरे मज ॥४॥