भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली

abhakta bramhan jalo tyachen tond | kay tyasi rand prasavali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥ ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥ तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥