भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंबुला माहेरीं भोगी धणीवरी

ambula maherin bhogi dhanivari

अंबुला माहेरीं भोगी धणीवरी । मग तया श्रीहरि सांगों गूज ॥१॥ माझें सुख मीच भोगीन । क्षेमेंसि निगेन अंगोअंगीं ॥२॥ सांडुनि कुळाचार जालिये निर्लज्ज । तुम्ही काय मज शिकवाल ॥३॥ रखुमादेविवरु विठ्ठल मातापिता । मी त्याची दुहिता सर्वांगुणीं ॥४॥