भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥ घेऊनि हरीश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥ धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लागे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी म्हणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरी म्हणतां ॥१॥ हरी म्हणतां भुक्ती हरी म्हणतां मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥ आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीकथेवांचून इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथें ॥१॥ जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नास कारणांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥ न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे ॥१॥ पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दात खीळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं झालों ॥१॥ म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तं अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीनाम वेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार वोल्हावली ॥१॥ तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥

रचनाकार: संत तुकाराम