भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना

harichya jagarana | jatan kan re naye mana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठी ॥२॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥