भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण

harichiya bhakta nahin bhayachinta | duhkhanivarita narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥ न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥ असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥ तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥