भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे

hariche nam kadakali kan re naye vache | mhanatan ramaram tujhya bache kay venche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे ॥१॥ पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दात खीळ ॥ध्रु.॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥२॥ तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । रामराम न म्हणे त्याचा गाढव माता पिता ॥३॥