भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल

hari hari tuhmin mhana re sakal | tenen mayajal tutail

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥ आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥ भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥ तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥३॥