भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें

harichya dasan sopen varma | sarva dharma paulen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥ सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥ तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥