भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीकथेवांचून इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथें

harikathevanchun ichchhiti svahit | harijan chitta na ghala tethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीकथेवांचून इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथें ॥१॥ जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नास कारणांचा ॥ध्रु.॥ ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥ तुका म्हणे काय झालेती जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥