भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठी ॥१॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्त कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगावरी आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगी झाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि चुकला ॥१॥ करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा । देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम