भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया

bhokta narayan lakshumicha pati | mhanoni pranahuti ghetaliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्त कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥ विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥ कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्ताचें तुका म्हणे ॥३॥