भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण

bhedabhedatala na ghade ghalitan | athava re atan narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥ भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥ तुका म्हणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥