भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥ याचा कांहीं तुह्मीं देखावा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मतिविण काय वर्णु तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥ आशौच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंत्रतंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥ राम कहे त्यागे पगहूं लागूं । देखत कपट अभिमान दुर भागूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥ काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥ आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड प्रेम असो ॥१॥ प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मन पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम