भजनी मालिका
← भजनांकडे परत

मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड प्रेम असो

madhura uttarasaven nahin chad | antarangin vad prem aso

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड प्रेम असो ॥१॥ प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥ जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥ तुका म्हणे भाव निष्टावंत चित्तीं । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥