भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥ परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥ मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥ ऐसें ठावें झालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥ गर्जो हरीचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ती तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥ या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥ तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥१॥ भांडवल गांठी झालेंसे पुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥ इच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंतले हो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥ पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम