भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं

magen pudhen nahin | dujen yavegalen kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥ नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ध्रु.॥ विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥ तुका म्हणे कांहीं । बोलायची उरी नाहीं ॥३॥