भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां

magen bahutan janan rakhilen adani | dhanvasi nirvani nam ghetan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥ ऐसें ठावें झालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥ माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥ अझुनि कां नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥ तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥