माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा
majhiya mipana | jala yavari ugana
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
majhiya mipana | jala yavari ugana
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
majhiya mipanavar padon pashan | jalo hen bhushan nam majhen
माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥
majhiya sanchita | drudh dekhoni balivanta | palasi pandharinatha | bhene atan tayachya
माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एका संपादिसी । मान करिसी येकाचा ॥ध्रु.॥
majhiye jatichen maj bheto koni | avadichi dhani phedavaya
माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥ आवडे ज्या हरी अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥
majhiye buddhicha khuntala upay | karisil kay pahane ten
माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे तें ॥१॥ सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥
majhiye manincha jana ha nirdhar | jivasi udar jhalon atan
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार झालों आतां ॥१॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥
majhiye manincha janoniyan bhav | to kari upav gururavo
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो ॥१॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥
majhi atan lok sukhen ninda karu | mhanati vicharu sandiyela
माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥ध्रु.॥
majhi atan satta ahe | tumhan payan he varati
माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥ एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥
majhi path kara kavi | ut lavi darodar
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥ तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
majhi bhakti bholi | ekavidh bhavabali
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥
majhi maj ali rokadi prachit| houni phajit duhkh pave
माझी मज आली रोकडी प्रचीत। होऊनि फजित दुःख पावे ॥१॥ काहीं द्वेष त्याचा करितां अंतरी। व्यथा या शरीरीं बहुत झाली ॥ध्रु.॥
majhi maj jati avarali deva | na vhava ya gova indriyancha
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥ कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥
majhi melin bahuvarin | tun kan jaisa taisa hari
माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥ विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥
majhi viththal mauli | premen panha panhaili
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥ कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
majhi sarva chinta ahe vithobasi | mi tyachya payansi na visambhen
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥ विसरणे रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥
majhe antarinchen tochi jane ek | vaikunthanayak pandurang
माझे अंतरींचें तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥
majhen aradhan | pandharapurinchen nidhan
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
majhe gadi kon kon | nivada bhinna yantuni
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥ आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
majhen ghongaden padilen thayin | mag taya payin sampadala
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥