भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार झालों आतां

majhiye manincha jana ha nirdhar | jivasi udar jhalon atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार झालों आतां ॥१॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुम्हां ॥३॥ तुका म्हणे संतीं घातला हवाला । न सोडीं विठ्ठला पाय तुझे ॥४॥