भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी

majhe gadi kon kon | nivada bhinna yantuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥ आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥ घाबरियांच्या मीडा काड्या । धाडा भ्याडा वळतियां ॥२॥ तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥