भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा

majhi maj jati avarali deva | na vhava ya gova indriyancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥ कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥ भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥ तुका म्हणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुम्हां ॥३॥