भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे अंतरींचें तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग

majhe antarinchen tochi jane ek | vaikunthanayak pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे अंतरींचें तोचि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥ सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥ गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥ तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥