भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा

magen santin hoten jen jen sangitalen | ten yeun lagalen anubhava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥ वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥ तुका म्हणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥४॥