भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा

bhog bhogavari dyava | sanchitacha karuni theva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥ शांती धरणें जिवासाठी । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥ देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥२॥ तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रम्हरसी ॥३॥