भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान

bhog to na ghade sanchitavanchuni | karaven ten manin samadhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥ आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥ तुका म्हणे भार घातलिया वरी । होईल कैवारी नारायण ॥३॥