भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा

bhenen pale dolasa | na kale mrutyu to sarisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥ कैसी जाली दिशाभुली । नवजाति ये वाटे चाली ॥ध्रु.॥ संसाराची खंती । मावळल्या तरी शक्ती ॥२॥ तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥