भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां

bhogila gopikan yadavan sakalan | gaulanigopalan gainvatsan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥ भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥ रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥ नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥