भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा

bhetichi avadi utavil man | lagalense dhyan jivin jiva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥ नेत्र उन्मिळत राहिले ताटस्थी । गंगा अश्रुपाती वहावली ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥