भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटीलागीं पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा

bhetilagin pandharinatha | jiva lagali talamal vyatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ॥१॥ कधी कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥ तुका म्हणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥