भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

तुमचीं नामें गाऊं मुखें । तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥ नका यासी व्यवधान । मेळवा नयन नयनासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥ याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं । ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली । मती विस्तारें फांकली । फळ संभारीं हरिनामें ॥१॥ नवल कृपामृतधन । वरुषला तुमचें हें वरदान । माझी वाचा आणि मन । केलीं पावन कीर्तनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दांचें ॥१॥ तरी हे कां जी चेतविली । गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्या पायीं ठेवितां चित्त । पुरले हेत सकळही ॥१॥ बरवें वर्म हें हाता आलें । संतीं दिधलें दाखवूनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्या पायीं माझें हित । होईल निश्चित हेंचि वाटें ॥१॥ आणखी कोणा शरण जाऊं । आहे उपाऊ तुम्हां हातीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हा दासांचें जीवन । घडे अमृताचेचि पान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥१॥ म्हणेनियां नये करुणा । माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा । परि मी कैसा ओळखों ॥१॥ जेव्हां प्रगटोनि भेटी दयाल । तेव्हांचि फावाल सुरवाडें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा