भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

झाला विरह अंतरी कामिनीसी । न ये सांगतां बोलतां कोणापासी । मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कापे तेणें झाली कासाविसी वो ॥१॥ हदई आठवे रीरंगसावळा । मनचि गुंतलें तयापासिं डोळा । कोण आणिल वो तया याचि वेळा । दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

झाला विरह हे नये देहावरी । देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथें थोरी । नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥ आण वेगिरी तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नदाचा कुमर । तया भेटतांचि होईल उतार । पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं । नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई ॥१॥ निढळासी बोट लावितेसी वेळोवेळां । नमनाचि होतें सहज खेळतां या खेळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

टिपरियाचे घाई गे नाच सुखें बाई । गितीं गाऊनियां हरिचें संगमसुख घई ॥१॥ नाचोनियां फेरि गे गुण त्याचे उच्चारी । जेणें काग बग रिठा मर्दियले वैरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥ याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ठेवाल तेथें राहेन सुखें । यावरी हरिखें आपुलिया ॥१॥ न वंची मी हे सेवेसी काया । धाडाल ठायां जाईन त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥ तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा