भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवा पायांपाशी । राहेन मी सावकाशी

theva payampashi | rahen mi savakashi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ठेवा पायांपाशी । राहेन मी सावकाशी ॥१॥ करुनियां तुमचें ध्यान । मुखीं नामाचें चिंतन ॥२॥ नेदीं कांही आड येऊं । आशा कल्पनेचा भेऊं ॥३॥ निळा म्हणे तुमची करुं । सेवा चरण ह्रदयीं धरुं ॥४॥