भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

जिहीं धरुनी हरि मनीं । ह्रदयीं वदनीं रंजविला ॥१॥ त्यांचा झाला अंकित ऐसा । घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥ त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा । यालागीं घडावा संतसंग ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी साई । आपणापाशीं बैसविले ॥१॥ प्रल्हादा संकटीं रक्षिलें । ध्रुवासी अढळपदीं बैसविलें ॥ उपमन्या नेउनियां रक्षिलें । क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जीवाचा ही जीव तूंचि प्राणांचा प्राण । नयनाचेहि नयन तूंचि घ्राणाचे घ्राण ॥१॥ सर्वही इंद्रियभाव तूंचि माझे श्रीहरी । तुजविण न दिसे पाहतां मज मी माझारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जीवें भावें जोडिलें होतें । पूर्व फळा तें आजी आलें ॥१॥ अंगीकार तुम्ही केला । मुखींचा दिधला प्रसाद ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जें जें करिती तें तें वृथा । पंढरिनाथा न भजतां ॥१॥ दिसे पुढें परी तें माया । जाइल विलया क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जे जे होऊनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ॥१॥ त्यांचे अंगी विसांवला । ह्रदयींचि राहिला प्रगटोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा । झाला वरिष्ठा तो ॥१॥ पहा प्रल्हाद दैत्यवंशी । झाला देवासी परम पूज्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें छत्र सिंव्हासन । दिधलें आसन त्रिणाचें त्या ॥१॥ काय उर्त्तीण होईजे रंकें । तेंचि म्यां मशकें संतचरणा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें पृथ्वीसीं धरीलें । सूर्या प्रकाश उटिलें । चंद्रबिंबीं अमृत ठेविलें । तेणें निववीत जगा तो ॥१॥ गगना पवाडू दिधला । मेरुस्तंभ उभारिला । गती पवनही उडविला । दाही दिशा फिरतसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें मंथुनि क्षीरार्णव । काढिलीं अपूर्व दिव्य रत्नें ॥१॥ त्याचा महिमा वर्णूं कैसा । भरोनी आकाशा कोंदला तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती ॥१॥ त्याचें उत्तीर्ण होउं म्हणतां । जीवा जीवपण नुमसे आतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा