भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥ तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चाल म्हणसी बाईगे खेळों लपंडाई । जेथें तेथें साक्ष कान्हा लपो कोणें ठाई ॥१॥ झाकुनियां डोळा गे लपविली चपळा । लेपों जाति जेथें तेथें कलकलिती बाळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां ॥१॥ तंव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी । मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चित्तीं माझें पांडुरंग । बैसला अभंग न ढळेसा ॥१॥ जातां दिवस जातां राती । स्वप्नीं जागृतीं सुषुप्तीं तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चिमणाचि देखिला परि हा वाड झाला । गगनहि फांकला प्रकाश वरी ॥१॥ भरोनियां दाही दिशा कोंदाटला । पाताळा वरिही गेला पदांकु याचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चिरें आणूनियां वेंष्टलें । गोवळ अवघेचि शृंगारले । येरेयेरां म्हणती भले । गौरव घ्या रे मामाचा ॥१॥ चिरें गुंडिती माजेसी । उंच पटके ते पायासी । झगे वेष्टूनियां शिरासी । विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चुचकारुनि गोधनें बैसविलीं आखरीं । म्हणती याहो श्रीहरी खेळों आतां ॥१॥ धावतीं वोढाळें आवरिलीं सकळें । झालों तुझिया बळें बळीवंत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती । फेरे खाती यातना ॥१॥ संकटापासूनि सोडविता । कोण हो होता देवावीण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे ॥१॥ परि त्या आधार दीपज्योति । कातडी नुसती येहवीं ते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा