भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतितों मी चिंतनीं । रुप तुमचें अनुदिनीं

chintiton mi chintanin | rup tumachen anudinin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चिंतितों मी चिंतनीं । रुप तुमचें अनुदिनीं ॥१॥ कराल कृपा म्हणोनियां । विठो पंढरीच्या राया ॥२॥ मागें उध्दरिले बहुत । लहान थोरले पतीत ॥३॥ नेले वैकुंठासी । महापापीमहा दोषी ॥४॥ ऐसी ऐकोनियां मात । चरणीं विगुंतला हेत ॥५॥ निळा म्हणे याचि लागीं । घेतो लाहो करितों सलगी ॥६॥